एखाद्या ब्रॅण्डला ‘लाईक’
करणा-यांचे आकडे फुगवून सांगण्यासाठी फेसबुक वरील बनावट अकांउटचा वापर होत
आहे. त्यामुळे अशा व्यक्तींच्या
आयडेण्टीटीची तपासणी करण्याची मोहीम फेसबुक ने हाती घेतली आहे. अशा बनावट अकांउट पासून आपल्या ब्रॅण्डचे लाईक
करणारे वाढवायचे आणि आकडे फुगवून सांगायचे असे प्रकार हल्ली चालले आहेत म्हणून ही
कारवाई फेसबुक करत आहे.
पण एवढ्यानेच फेसबुकचा किंवा
सोशल मिडियाचा गैरवापर थांबेल का? २-१३
वर्षांची लहान मुलं खोटी जन्मतारीख किंवा जन्मवर्ष टाकून अकांउट सुरू करतात. त्यावर त्यांनी पाहिलेल्या गोष्टींचा परिणाम
कळत नकळतपणे त्यांच्यावर होत असतो.
याबाबतीत पालकांची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यांना इतक्या लहान वयात अकांउट उघडून
देण्याची परवानगी देता कामा नये किंवा सोशल मिडिया वापरण्यावर प्रतिबंध केले
पाहिजे.
No comments:
Post a Comment