एखादा पूल बांधायचा असल्यास रस्त्यावर खड्डे, खडी-सिमेंटचा ढिगार, वाहतुकीचा
खोळंबा असे चित्र आपल्यासमोर येते. पण
अंधेरी जोग उड्डाणपुलावरील वाहतुकाचा खोळंबा न करता केबल पूल बांधला आहे.जमिनीपासून
१९.४ मीटर उंचीवर हा केबल पूल बांधण्यात आला असून आशियातील इतक्या उंचावरील पहिलाच असा पूल आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर मेट्रोरेल्वे बांधण्याचे काम सुरू असून ते ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’च्या अखत्यारितील ‘मुंबई मेट्रोवन प्रा. लि.’ या कंपनीतर्फे
होत आहे. हा ११.४ किलोमीटर लांबीचा मेट्रोरेल्वे मार्ग बांधण्यासाठी अंधेरी रेल्वे मार्गावरून जाणारा पूल
आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जोग उड्डाणपुलाच्या वरून जाणारा हा
केबल पूल ही दोन मोठी आव्हाने आहेत. रेल्वेमार्गावरील पुलाच्या कामासाठी मेगाब्लॉक मिळणार आहेत. पण या केबल पुलाचे काम पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक आणि
त्यावरील जोग उड्डाणपुलावरील वाहतुकीचा खोळंबा न करता
करण्यात आले आहे. या
दोन्ही रस्त्यांवरून दिवसभरात सुमारे एक लाख २० हजार वाहने
ये-जा करतात. त्यामुळे हा १७५ मीटर लांबीचा पूल बांधण्यासाठी चीनहून ‘फॉर्म ट्रॅव्हलर’ यंत्र खास मागवण्यात आले.
No comments:
Post a Comment