जातीय दंगल
उसळली की आरोप - प्रत्यारोपांची फैर झडते. राजकीय स्वार्थ साधण्याचे
निलाजरे प्रयत्न केले जातात परंतु, उत्तर प्रदेशातील दंगलीबाबत
मात्र सर्व जण एकदम चूप आहेत जातीय दंगली हा डाव्या पक्षांचा जिव्हाळ्याचा विषय पण त्यांनी साधे पत्रकही काढलेले नाही.
काँग्रेसने
गळा काढला नाही. आश्चर्य याचे की भाजपसुद्धा मूग गिळून बसला आहे. कारण हे सर्व पक्ष पुढील लोकसभा
निवडणुकीकडे डोळे लावून बसले आहेत आणि त्या निवडणुकीत मुलायम
महत्त्वाची भूमिका बजावतील असे त्यांना वाटते म्हणून मुलायमसिंह यांना दुखविण्यास
कोणी तयार नाही तिसरी आघाडी स्थापन करून पंतप्रधानपदी बसण्याचे स्वप्न मुलायम
पाहात आहेत डाव्यांना म्हणून ते हवेआहेत. तिसऱ्या आघाडीत ते जाऊ नयेत
म्हणून काँग्रेसचे प्रयत्न आहेत तर निवडणुकीनंतर अस्थिर परिस्थिती
उद्भवली तर मुलायमसिंह हाताशी हवेत असे भाजपला वाटते तीयदंगलींवरून त्यांना कोंडीत पकडले तर ‘अल्पसंख्यकांचे मसिहा’ म्हणून ते काँग्रेसच्या तंबूत शिरतील अशी धास्ती भाजपला वाटते. ९८मध्ये मुलायमसिंह यांनीच सोनिया गांधींना पंतप्रधान होण्यापासून रोखले होते. एकटय़ा बहुजन समाज पक्षाचा
मुलायमसिंह यांना प्रखर विरोध आहे.
No comments:
Post a Comment