निवडणुकीच्या
मार्गाने जाऊन देशातील सगळ्याच राजकीय पक्षांवर दबाव निर्माण
करणे शक्य होणार नाही, असे हजारे यांना वाटते, तर लोकांच्या मनातील तीव्र
भावनांच्या लाटेवर स्वार होऊन नवा पक्ष काही प्रमाणात आपले
अस्तित्व दाखवू शकेल, असे केजरीवाल यांना वाटते. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन चालवणे म्हणजे केवळ उपोषणे
करणे नव्हे, त्यासाठी समाजात विश्वास निर्माण केलेल्या
कार्यकर्त्यांचे देशभर जाळे निर्माण करणे आवश्यक असते. संघटना बांधणी करताना
त्यातील प्रत्येक घटक तिच्या मूळ ध्येयापासून दूर जाणार नाही,
याचीही दक्षता घ्यावी लागते. या पुढील काळात अण्णा त्यावरच लक्ष केंद्रित करणार असले,
तरीही कार्यकर्त्यांसाठी निश्चित कार्यक्रम देणे ही
त्यांचीच जबाबदारी आहे.
No comments:
Post a Comment