Thursday, 13 September 2012

‘काचबंद’

काचेच्या इमारती दिसायला चकचकीत असतात खऱ्या, पण त्यांचा आपल्या वातावरणाला त्रासच असल्याचे लक्षात आले आहे- पर्यावरणाच्या दृष्टीने आणि सुरक्षिततेसाठीसुद्धा! त्यामुळेच बृहन्मुंबई महापालिकेने अशा इमारतींना परवानगी नाकारण्याचे ठरविले आहे. मुंबईत गेल्या काही महिन्यांमध्ये अशा इमारतींमध्ये आगीच्या दोन घटना घडल्या. त्या विझवताना असे लक्षात आले की, धूर बाहेर जाण्यासाठी जागाच नसल्याने या इमारतींमध्ये मोठय़ा प्रमाणात धूर साचून राहतो. तो अतिशय घातक ठरतो. विशेष म्हणजे या इमारतीच्या काचा फोडणे शक्य न झाल्याने धूर बाहेर काढताना आणि आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशामक दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली. गेल्याच आठवडय़ात बांद्रा-कुर्ला संकुलातील आग लागलेल्या इमारतीत धूर बाहेर काढण्यासाठी या काचा फोडण्याच्या प्रयत्नात काही जवान जखमी झाले. त्यामुळे या इमारती धोकादायक असल्याचे सांगत त्यांना ना हरकत परवाना नाकारण्याचे ठरविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment