Friday, 21 September 2012

महंगाई मार गई



           विरोधी पक्षांचा मुख्य मुद्दा प्रथम भ्रष्टाचार हा होता, पण त्यावरून बंदचे आवाहन करण्यात आले नाही. कारण केंद्र सरकारच्या भ्रष्टाचारावरून विरोधी पक्ष कितीही ओरडा करीत असले तरी सत्तेत आल्यावर त्यांच्याकडून वेगळा कारभार घडण्याची शाश्वती नाही. भाजपच्या राज्यांत काय चालू आहे हे जनता पाहात आहे. तेव्हा उगाच हात दाखवून अवलक्षण कशाला, म्हणून भ्रष्टाचारावरून विरोधी पक्षांनी फक्त संसदेत रणकंदन केले. रस्त्यावर काही ते उतरले नाहीत. मात्र सरकारने डिझेलची दरवाढ जाहीर करताच विरोधी पक्षांना हत्यार मिळाले. त्यात किराणा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीची भर पडली. परकीय गुंतवणुकीचा विषय हा काही सर्वसामान्यांना थेट भिडणारा नाही. त्यामागील आर्थिक गुंतागुंतीत त्याला रस नाही. गुंतवणूक कशीही आणा, पण रोजगार निर्माण करा म्हणजे झाले, असे देशातील कोटय़वधी गरिबांचे म्हणणे आहे. त्यामुळे परकीय गुंतवणुकीचा विषय हा माध्यमांमधील चर्चेपुरता मर्यादित आहे. डिझेल भाववाढीचे तसे नाही. ही भाववाढ सर्वच स्तरांवरील जगणे महाग करणार आहे. त्यात भर पडली स्वयंपाकाच्या गॅसवरील र्निबधांची. हे र्निबध मध्यम वर्गाला बरेच त्रासदायक ठरणारे आहेत.

No comments:

Post a Comment