राज्यातील शिवसेना व भाजप या प्रमुख विरोधी पक्षांना
सातत्याने सत्ता हुलकावणी दाखवत आहे,याचे कारणही त्यांना कळले आहे. त्यामुळेच आठवले यांचे शिवसेना-भाजपने विशेषत:
सेनानेतृत्वाने जोरदार स्वागत केले. परंतु सत्तेच्या जवळ जाण्यासाठी जी राजकीय
बेरीज-वजाबाकी करावी लागते, त्याबाबत मात्र शिवसेनेने फारसा
गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही. त्याचा परिणाम मुंबई महापालिका निवडणुकीत
दिसला. शिवसेना-भाजप-आरपीआय या महायुतीने एकत्रित निवडणुका लढविल्या, सत्ता मिळाली, परंतु त्यात आरपीआयच्या पदरात काहीच
पडले नाही. आरपीआयची कामगिरी निराशाजनक ठरली. शिवशक्ती- भीमशक्तीची ती पहिली
राजकीय कसोटी होती, त्यातच आरपीआयने मार खाल्ल्याने रामदास
आठवले फारच अस्वस्थ होते. त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला होता. ते
अस्तित्व दाखविण्यासाठी त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त
साधला. ३ ऑक्टोबर या रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनादिनाचे औचित्य साधून त्यांनी मुंबईत
जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरविले. आता वर्षां-दीड वर्षांत लोकसभा व विधानसभा
निवडणुकीचे पडघम वाजू लागतील. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या नेत्यांना आपली ताकद
दाखविणे आठवले यांना आवश्यक वाटले असावे.
No comments:
Post a Comment