स्टिंग
ऑपरेशन्समुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली नाही तर नवलच. आंतरराष्ट्रीय स्तरावरील
अव्वल दर्जाच्या संघांमधील अनेक खेळाडूंना विविध उद्योगसमूहांचे प्रायोजकत्व
लाभलेले असते. हा खेळाडू मैदानावर जास्तीत जास्त वेळ खेळत राहिला तरच या
खेळाडूंच्या पुरस्कर्त्यांना फायदा मिळतो. जर हे खेळाडू फार वेळ टिकले नाहीत तर या
प्रायोजकांचे खूपच नुकसान होते. हे लक्षात घेऊन क्रीडा स्पर्धाचे आंतरराष्ट्रीय
स्तरावर व्यवस्थापन करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीने पंचांचीच मदत घेण्याची
शक्कल लढविली आहे. खेळाडूंना नाबाद ठरविण्याचे सर्वस्वी अधिकार पंचांना असतात.
ज्या निर्णयांबाबत तिसऱ्या पंचांचा अडथळा येणार नाही, असे काही निर्णय घेणे मैदानावरील पंचांच्या हातात असते. पायचीत,
नोबॉल यांसारख्या निर्णयांमध्ये सहसा तिसऱ्या पंचांचा अडथळा येत
नाही. हे लक्षात घेऊनच या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर काही सामन्यांमध्ये पंचांना
लाच देण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्टिंग ऑपरेशन्समध्ये दाखविण्यात आले आहे. या
पंचांमध्ये प्रामुख्याने पाकिस्तान, बांगलादेश व श्रीलंका
या देशांमधील काही पंचांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी)
आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी अव्वल श्रेणी समिती तयार केली आहे. या समितीमधील
पंचांचा या स्टिंग ऑपरेशन्समधील पंचांमध्ये समावेश नाही. मात्र या सहांपैकी दोन पंचांनी
यापूर्वी काही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले आहे, तर काही पंचांनी आशियाई खंडातील काही खासगी लीग स्पर्धामध्ये पंच म्हणून
काम केले आहे. क्रिकेटमध्ये पैशाचा भरघोस ओघ सुरू झाल्यानंतर येनकेनप्रकारेण पैसा
मिळविण्याचा प्रयत्न या क्षेत्रातील अनेकांकडून केला जात आहे.
No comments:
Post a Comment