Tuesday, 2 October 2012

दमलेल्या बाबाची कहाणी




         वडिलांनी कष्टाने मिळवलेल्या संपत्तीसाठी त्यांचाच छळ अकर्तृत्ववान मुले करतात, हे प्रमाण भारतात जास्त आहे. याचे कारण येथे त्याबाबत वृद्धांना कायदेशीर संरक्षण मिळण्यात खूपच अडचणी आहेत. वडिलांचा छळ करून त्यांची मालमत्ता पळवणारी मुले त्यांना वाऱ्यावर सोडू शकतात, कारण त्यांना कायद्याची वेसण नाही आणि पोलिसांचाही धाक नाही. वृद्धांनी मूकपणे छळ सहन करण्याऐवजी पोलिसांकडे धाव घेतली, तर त्यांना नंतरच्या काळात संरक्षण मिळण्याची हमी नाही. एकटय़ाने आयुष्य कंठताना येणाऱ्या अडचणींवर वृद्धाश्रम हा उत्तम पर्याय असला, तरी त्याबाबत समाजाचा दृष्टिकोन अद्यापही निकोप नाही. वडिलांच्या पैशांवर चैनबाजी करणाऱ्या मुलांना स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्याची गरज वाटत नाही आणि त्याबाबतचे संस्कार करण्यासाठी पालकही मनावर घेत नाहीत. जगातल्या सगळ्या भागांत वृद्धांना त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी केवळ शारीरिक नव्हे, तर भावनिकही आधार हवा असतो. आयुष्यभर खस्ता खाऊन संसार उभा केल्यानंतर वृद्धापकाळी असा छळ सहन करावा लागणे हाच समाज मनोरुग्ण असल्याचे निदर्शक आहे. करणाऱ्या मुलांना स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्याची गरज वाटत नाही आणि त्याबाबतचे संस्कार करण्यासाठी पालकही मनावर घेत नाहीत. जगातल्या सगळ्या भागांत वृद्धांना त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी केवळ शारीरिक नव्हे, तर भावनिकही आधार हवा असतो. आयुष्यभर खस्ता खाऊन संसार उभा केल्यानंतर वृद्धापकाळी असा छळ सहन करावा लागणे हाच समाज मनोरुग्ण असल्याचे निदर्शक आहे.

No comments:

Post a Comment