वय
सरू लागले की ही रंगीत दुनिया भल्याभल्यांना वाटाण्याच्या अक्षता लावते, असा आजवरचा अनुभव आहे. पण वयानुरूप स्वत:मध्ये बदल घडवून आणण्यासाठी
जिद्द असली की काळावरही स्वार होता येते, हे
अमिताभसारख्या अभिनेत्यामुळे लक्षात येते. ज्या प्रकारचे चित्रपट गेल्या पंधरावीस
वर्षांत त्यांनी केले, ते करण्याची हिंमत त्यांच्या
आधीच्या पिढीतील कुणा नटाने केली असती का अशी शंका येते. मग तो ‘चीनी कम’ असो की ‘पा’.
जीवनातल्या उतार चढावांमुळे बहकून न जाण्यासाठी अमिताभकडे
स्थितप्रज्ञता आहे. त्यामुळे आपण एक ‘ब्रँड’ आहोत, याचे भान ठेवूनही सतत आपली अभिजातता
जपून ठेवणे त्याला शक्य होते. अलीकडेच प्रकाशित झालेले त्यांचे रवींद्र संगीतातील ‘एकला चलो एकला चलो रे’ हे गाणे ऐकले की हे सजह
लक्षात येते. राजकारण असो की व्यक्तिगत जीवनातील शिंतोडे अमिताभने प्रत्येकवेळी
आत्मभान जपले आणि त्यामुळे प्रत्येक चित्रपट ‘बॉक्स ऑफिस’वर यशस्वी झाला नाही, तरी त्याने आपल्या
प्रतिमेला जराही धक्का पोहोचू दिला नाही. सत्तराव्या वाढदिवशी रसिकांचे ऋण मान्य
करत असतानाच पुढील योजना आखू शकणाऱ्या या अभिनेत्याला त्यामुळेच सलाम करायला हवा!
No comments:
Post a Comment