काल झी मराठी वरील ‘एका लग्नाची दुसरी
गोष्ट’ ही मालिका संपली. झी मराठी वरील वेगळी
अशी ही तिसरी मालिका होती (अर्थात माझ्या दृष्टीने) पहिली श्रीयुत गंगाधर टिपरे,
दुसरी ऊन पाऊस आणि तिसरी ही एका लग्नाची दुसरी गोष्ट या सगळ्यांच ‘वेगळ’
होतं. तिनही मालिका उगाच लांबवल्या
नव्हत्या, प्रेक्षणीय होत्या, कलाकार मंडळी तगडी होती. तिनही मालिकेतील तीन व्यक्तीरेखा न
विसरण्यासारख्या आहेत. श्रीयुत गंगाधर
टिपरे मधील खुद्द आबा, ऊन पाऊस मधील मुक्ता (प्रिया खोपकर) आणि एका लग्नाची दुसरी
गोष्ट मधील ईला भाटे (घनाची आई) मुक्ता बर्वेचीही व्यक्तीरेखा चांगली होती पण ईला भाटे
is best.
ऊन पाऊस मालिका सोडली तर उरलेल्या दोन्ही
मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका नव्हतीच.
संपूर्ण मनोरंजनात्मक होत्या. एका लग्नाची
दुसरी गोष्ट थोडी लांबवल्यासारखी वाटली पण तितक्यात ती आटोपली. पण त्यातल गाणं नेहमीच माझ्या तरी लक्षात
राहील.
तुझ्याविना तुझ्याविना
तुझ्याविना तुझ्याविना
No comments:
Post a Comment