शेवटी अरूप पटनायक यांना बढती (?) देऊन सत्यपाल सिंह यांना मुंबईचे नवे पोलिस
आयुक्तपदी नेमले. हा पहिला ‘राज’ हट्ट
पूर्ण झाला आता टार्गेट आबा. आबा कधी
राजीनामा देताहेत याची ‘वाट’ आता राज ठाकरे पाहताहेत. राज ठाकरेंच्या मोर्चाला शिवसेनेने ही पाठिंबा
दिला आहे दादाने ही (अजित दादा नव्हे) पाठ थोपटली आहे आणि पटनायक यांची बढती (?)
हे सर्व पाहता त्यांचा मोर्चा यशस्वी झाला म्हणायचा.
राज ठाकरे यांनी
आपल्या भाषणात सांगितले की पोलिसांवर आणि माध्यकर्मींवर हात उचलायला नाही पाहिजे
होता. पोलिसांवर आणि माध्यमांवर राज
ठाकरेंनी सहानुभूती दाखविली. “एका बाजूला
पोलिस आणि दुस-या बाजूला माध्यमे असे पाठबळ असेल तर संघटना न बांधताही हवेत उडता
येते” (संदर्भ:- दिव्य मराठी अग्रलेख:महाराष्ट्र धर्म) गर्दी आणि टाळ्या या गोष्टी
मिळविण्यात काका पुतण्यांचा कोणी हात धरू शकत नाही. बालहट्ट आणि राजहट्टापुढे काही चालत नाही असे
म्हणतात. आता पुढचा ‘राज’ हट्ट पूर्ण
होतोय का हे पाहूया.
This is unfortunate, Arup patnaik and his team had done a good job on 11th august and he is been transered and removed as a commissioner because of Raj thackeray fear. It would had been more pathetic if police would had not control this that they had done on 11th.
ReplyDelete