अरूण
गवळी यांना फाशी होईल की नाही हे माहित नाही पण नेमके जामसांडेकर हत्या प्रकरण आहेत तरी काय हे आपण समजून घेऊ.
स्थानिक राजकारण आणि बांधकाम व्यवसायातून जामसंडेकर
तसेच आरोपी साहेबराव भिंताडे व बाळा सुर्वे यांच्यात शत्रुत्व होते. याशिवाय साकीनाका
येथील एक
भूखंड मिळविण्याचा भिंताडे आणि सुर्वे यांचा प्रयत्न होता. मात्र नगरसेवक पदाचा फायदा उठवत तो मिळविण्यासाठी जामसंडेकर
यांनी नकार दिल्यानेही त्या दोघांचा त्यांच्यावर राग होता. या शत्रुत्वातूनच त्यांनी गवळीची मदत
घेऊन जामसंडेकर यांची हत्या घडवून आणली. गवळीला त्यांनी त्यासाठी ३०
लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यानंतर गवळी याने अशोक जयस्वाल याला
जामसंडेकर यांची हत्या करण्यासाठी पाठवले होते. त्यासाठी
गवळीने आपल्याला अडीच लाख रुपये दिले होते. त्यानंतर २ मार्च २००७ रोजी नरेंद्र,
विजय आणि जयस्वाल तिघेही जामसंडेकर यांच्या घाटकोपर येथील
असल्फा गावातील घरी गेले. घरात घुसल्यानंतर त्यांनी दिवाणखान्यात एकटेच बसलेल्या जामसंडेकरांवर
गोळ्या झाडल्या आणि पळ काढला. या घटनेनंतर
मे २००८ मध्ये गुन्हे अन्वेषण विभागाने गवळीला अटक केली होती. त्याआधी पोलिसांनी अन्य आरोपींना अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एका खंडणीप्रकरणी
अटक असलेल्या गवळीला पोलिसांनी नंतर अटक केली. विजय गिरी,
अशोक जयस्वाल आणि नरेंद्र गिरी या तिघांना न्यायालयाने दोषी
ठरविले.
No comments:
Post a Comment