Wednesday, 22 August 2012

चांगला निर्णय

शेवटी अण्णांनी आपण पक्ष स्थापन करणार नाही असे ब्लॉग च्या माध्यमातून जाहीर केले.  मी कधीही निवडणूक लढवणार नाही.  राजकीय पक्ष स्थापन करणार नाही असे त्यांनी ब्लॉगमधून सांगतले.  (या ‘बातमीकडे’ किती माध्यमांनी लक्ष दिले ही नंतरची गोष्ट) उपोषण सोडल्यानंतर पक्ष स्थापन करण्याबद्दल विचार करू असे अण्णांनी प्रतिपादन केले.  त्यावर उलट उलट मतं व्यक्त झाली.  जनता अण्णांकडे एक ‘मसीहा’ म्हणून पाहते.  अण्णांनी नेहमी उपोषणास्त्र उगारून चांगलेच यश मिळवले आहे.  आता फक्त थोडे अपयश मिळाले आहे.  अण्णांनी थोडा संयम बाळगावा.
        लोकशाहीला तिसरी शक्ती नेहमी लागते कारण लोकशाहीत सत्ताधारी किंवा सत्त्ताकांक्षी असे दोन पक्ष असतात.  या दोघांचीही राष्ट्राला गरज असते.  आणि दोघांना ताळ्यावर ठेवण्यासाठी तिस-या शक्तीची गरज असते.  आणि खूप महत्त्वाच म्हणजे ती शक्ती सत्ताकांक्षी किंवा सत्ताधारी नसते.  ती शक्ती असते राजकीय वर्गाला दिशा दाखविणारी किंवा त्यावर अंकूश ठेवणारी.  तिस-या शक्तीने दोन्ही शक्तींवर अंकूश ठेवावा, दिशा द्यावी किंवा त्यावर दबाव/प्रभाव ठेवावा.  ही शक्ती ‘अण्णा’ होऊ शकतात.  महाराष्ट्राच्या राजकारण्यांना याचा प्रत्यय आला आहे आता तो देश पातळीवर यावा.

No comments:

Post a Comment