Tuesday, 28 August 2012

चिल्लर पार्टी झिंगली


         पुण्यात ७०० मुलं मुली दारू पिऊन झिंगली होती आणि बहुतेकजणं ही २१ वर्षाखाली म्हणजेच अल्पवयीन होती.  मुंबईत मुलं मुली १० वी Pass Out होऊन कॉलेजला प्रवेश मिळवतात.  एका महिन्यात त्यांचा group तयार होतो.  मग सुरू होते खडवली, खोपोली, भिवपुरी रोड आणि पांडवकडा येथील पिकनिक्स.  तिथे सुध्दा अशीच मुलं झिंगतात फरक एवढाच की ६००-७०० मुलं एकत्र नसतात त्यात प्रत्येक वयोगटातील लोकं असतात आणि त्यात ‘अल्पवयीन’ मुल असतातच.  सांगण्याचा उद्देश इतकाच की हा असला प्रकार मुंबईत सुध्दा आहे.
          पूर्वीच्या काळी म्हणजेच आपले आई वडिल चोरून चित्रपट पहायचे.  चित्रपट पाहणे हे गैर मानले जायचं.  पण आता सहकुटुंब सहपरिवार चित्रपट पाहिले जातात.  काळ बदलला तशी मानसिकता बदलली आहे.  यात महत्त्वाच असं की लहान/अल्पवयीन मुलांनी दारू पिणं चांगल नाही.  मला वाटतं अल्पवयीन असल्याचे निष्कर्ष थोडे फार बदलले पाहिजे.  कारण हल्लीची पिढी ही Advance आहे असं आपण म्हणतो.  मग त्यांनी हे असल काही केल तर त्यात आश्चर्य का वाटाव?  कारवाई झालीच पाहिजे पण त्या आयोजकांवर त्यांनी ‘जो पर्यंत शौचाला जात नाही तोपर्यंत दारू फुकट द्यावी’ अशी Scheme राबवली.  आणि फेसबुक आणि Blackberry चा वापर व्यवस्थित करणारी पोरं ही मला तरी अल्पवयीन वाटत नाही.

Monday, 27 August 2012

इतना सन्‍नाटा क्यों है भाई?




          शोलेतला हा फेमस डॉयलॉग मारणे ए.के.हंगल कालवश झाले.  ते ९५ वर्षांचे होते.  लगान चित्रपटात त्यांची एक लहानशी भुमिका होती.  एक शॉट देण्यापूर्वी ते Bathroom मधून पडले आणि त्यांच्या पाठीला लागले.  त्यांना इतका त्रास होत होता की त्यांनी डॉक्टरांना सांगितले की मला मारून टाका.  दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी त्यांना मुंबईला जाऊन उपचार घेण्यास सांगितले.  पण त्यांनी साफ नकार दिला.  The Show Must Go On असे म्हणून त्यांनी शॉट दिला.  अशा मोठ्या अभिनेत्याला भावपूर्ण श्रध्दांजली

Sunday, 26 August 2012

तुझ्याविना


          काल झी मराठी वरील ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ ही मालिका संपली.  झी मराठी वरील वेगळी अशी ही तिसरी मालिका होती (अर्थात माझ्या दृष्टीने) पहिली श्रीयुत गंगाधर टिपरे, दुसरी ऊन पाऊस आणि तिसरी ही एका लग्नाची दुसरी गोष्ट या सगळ्यांच ‘वेगळ’ होतं.  तिनही मालिका उगाच लांबवल्या नव्हत्या, प्रेक्षणीय होत्या, कलाकार मंडळी तगडी होती.  तिनही मालिकेतील तीन व्यक्तीरेखा न विसरण्यासारख्या आहेत.  श्रीयुत गंगाधर टिपरे मधील खुद्द आबा, ऊन पाऊस मधील मुक्ता (प्रिया खोपकर) आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट मधील ईला भाटे (घनाची आई) मुक्ता बर्वेचीही व्यक्तीरेखा चांगली होती पण ईला भाटे is best.
          ऊन पाऊस मालिका सोडली तर उरलेल्या दोन्ही मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका नव्हतीच.  संपूर्ण मनोरंजनात्मक होत्या.  एका लग्नाची दुसरी गोष्ट थोडी लांबवल्यासारखी वाटली पण तितक्यात ती आटोपली.  पण त्यातल गाणं नेहमीच माझ्या तरी लक्षात राहील.    
तुझ्याविना तुझ्याविना

Saturday, 25 August 2012

अरूण गवळी आणि जामसांडेकर





अरूण गवळी यांना फाशी होईल की नाही हे माहित नाही पण नेमके जामसांडेकर हत्या प्रकरण आहेत तरी काय हे आपण समजून घेऊ.
          स्थानिक राजकारण आणि बांधकाम व्यवसायातून जामसंडेकर तसेच आरोपी साहेबराव भिंताडे व बाळा सुर्वे यांच्यात शत्रुत्व होते. याशिवाय  साकीनाका येथील एक भूखंड मिळविण्याचा भिंताडे आणि सुर्वे यांचा प्रयत्न होता. मात्र नगरसेवक पदाचा फायदा उठवत तो मिळविण्यासाठी जामसंडेकर यांनी नकार दिल्यानेही त्या दोघांचा त्यांच्यावर राग होता. या शत्रुत्वातूनच त्यांनी गवळीची मदत घेऊन जामसंडेकर यांची हत्या घडवून आणली. गवळीला त्यांनी त्यासाठी ३० लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यानंतर गवळी याने अशोक जयस्वाल याला जामसंडेकर यांची हत्या करण्यासाठी पाठवले होते. त्यासाठी गवळीने आपल्याला अडीच लाख रुपये दिले होते. त्यानंतर २ मार्च २००७ रोजी नरेंद्र, विजय आणि जयस्वाल तिघेही जामसंडेकर यांच्या घाटकोपर येथील असल्फा गावातील घरी गेले. घरात घुसल्यानंतर त्यांनी दिवाणखान्यात एकटेच बसलेल्या जामसंडेकरांवर गोळ्या झाडल्या आणि पळ काढला. या घटनेनंतर  मे २००८ मध्ये गुन्हे अन्वेषण विभागाने गवळीला अटक केली होती. त्याआधी पोलिसांनी अन्य आरोपींना अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एका खंडणीप्रकरणी अटक असलेल्या गवळीला पोलिसांनी नंतर अटक केली. विजय गिरी, अशोक जयस्वाल आणि नरेंद्र गिरी या तिघांना न्यायालयाने दोषी ठरविले.

Friday, 24 August 2012

सुवर्णसंधी




          भारतात डिस्‍ने कंपनी एक हजार कोटी रूपये गुंतवणार.  यु.पी.ए सरकारने १० F.D.I प्रस्तावांना मंजूरी दिली आहे.  आपण एक माध्यम विद्यार्थी म्हणून आपल्यासाठी ही एक सुवर्णसंधीच म्हणावी लागेल.