Tuesday, 4 September 2012

अंकूश हवाच



            २८ ऑगस्ट रोजी प्रेस कौन्सिल चे अध्यक्ष यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियावर 
 PCI चे नियत्रंण आणावे असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मांडला.   आणि त्यावर Indian 
Newspaper Association ने विरोध दर्शविला आहे.  आयएनएसचे म्हणणे असे की . प्रिंट आणि 
इलेक्ट्रॉनिक मीडिया ही स्वतंत्र माध्यमे असून त्यांच्यासाठी स्वतंत्र नियमावलीची आवश्यकता आहे. तसेच 
भारतातील पत्रकारिता स्वतःवर नियंत्रण ठेवण्या इतकी प्रगल्भ असून लोकशाहीचा हा चौथा स्तंभ
 आपली जबाबदारी चोख बजावत आहे, असेही आयएनएसने म्हटले आहे
देशातील वृत्तपत्रे व वृत्तसंस्था यांच्या दर्जा उंचावण्यासाठी तसेच प्रसारमाध्यमांचे 
स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी संसदेने नेमलेली प्रेस कौन्सिल ही स्वायत्त संस्था आहे .  
त्यांना दिलेली जबाबदारी पुरेशी असून इलेक्ट्रॉनिक मीडियावर त्यांचे नियंत्रण आणू नये, असे स्पष्ट मत 
आयएनएसने नोंदवले आहे . सध्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियावर थोडा फार अंकुश असावा. 
 सर्व मीडिया या घोड्यासारखा चौफेर उधळला आहे.  त्याला कुठेतरी लगाम बसला पाहिजे. 
व्यंगचित्रांतून राजकीय टीका व्हावी पण वैयक्तिक आयुष्यावर घाला नको.  खाली फोटो पाहिल्यास अंदाज 
येईल की सोशल मीडियावर कसा मुर्खपणाचा कळस गाठला आहे.



आणि हे फोटो कोण तयार करतं, तर जी मुलं ज्यांना राजकीय ज्ञान अगदी शून्य असतं, आणि थोडफार फोटोशॉप येतं म्हणून.

 चांगल्याही गोष्टी होतात त्यात वाद नाही





पण संपूर्ण मीडियावर पूर्णपणे अंकूश हवाच नाहीतर चीनसारखी परिस्थिती भारतात यायला वेळ लागणार नाही.



Monday, 3 September 2012

धर्मशाळा


          महाराष्ट्र म्हणजे धर्मशाळा झाल्यासारखी वाटते.  कुणीही याव आणि टपली मारून जावं अशी स्थिती आहे.  १९९२-९३ साली बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत दंगली झाल्या.  आसा, धगधगत असताना मुंबईत दंगली झाल्या.  याच नेमकं ‘कनेक्शन’ काय?  त्याचे पडसाद इतर राज्यांमध्ये किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये का नाही पडत?

Saturday, 1 September 2012

देर है लेकिन अंधेर नही





          शेवटी अरूण गवळी यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  यामुळे भगवान के देर है लेकिन अंधेर नही या उक्तीची प्रचीती येते.  अरूण गवळीसह इतर १० जणांना जन्मठेप झाली.
          अरूण गवळीला पोलिस पकडायला आल्यास तो भिंतीत बनवलेल्या जागेत लपून बसायचा.  विजय साळसकर यांनी ते बरोबर हेरले आणि त्यांनी त्यावेळेला गवळीला जेरबंद केले.